Header Ads Widget

नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार द्या - प्रा. रवींद्र पाटील चव्हाण -

         माधव पवार
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकाचे दिनांक २० जुलै व २६ - २७ जुलै २०२३ रोजीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून राज्यातले सरकार बघ्याची भूमिका घेऊ नये असे माजी आमदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

नायगाव विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या शेतातील पिके वाहून गेली पाण्याखाली पिके गेली सदरच्या सततधार पावसाने अंहाकार माजविला असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अनेक भागात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली त्याच बरोबर नायागांव तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी सुद्धा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे

तालुक्यात व धर्माबाद उमरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकाचे अतिशय नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हाजर रुपये सरसकट पंचनामे करून अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशी मागणी भावी आमदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू वसंतराव पाटील चव्हाण यांनी केली आहे

सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये शेतकरी राजा अगोदरच कर्ज बाजारी असल्यामुळे शेतकऱ्याना तात्काळ अनुदान जाहीर करावे अशी प्रा. चव्हाण यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments