Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे यांचे तमाम गोदावरी काठावरील जनतेला आवाहन

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील गंगा पात्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जनतेसह नागरिकांना महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे यांच्या कडून आवाहन करण्यात येते आहे

सध्या राज्यासह नांदेड जिल्ह्या बरोबर ग्रामीण भागात मुसळधार पावसामूळे नदी नाले तुडुंब भरून जात असल्यामुळे स्वतःची काळजी घेऊन पुरातून जाऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे 

तालुक्यातील बरबडा गावासह तालुक्यातील सर्व नागरिकांना व नदी काठच्या शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची सूचना करण्यात येत असून सध्याच्या पुर परिस्थिती पाहता पाण्यातून वाहने घेऊन जावू नयेत आपले जाणवरे सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे त्याच बरोबर शाळेतील मुलाची काळजी घ्यावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे यांनी शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे

बरबडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे असे कळविले की सध्या पावसाचे थैमान असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात येत असल्यामुळे  नदी काठच्या शेतकऱ्यांनी आपली सुरक्षित ठिकाणी
आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments