Header Ads Widget

आमदार राजेश पवार माध्यमातून ३० लाख तर राजेश देशमुख यांच्या प्रयत्नातुन ३० लाख रुपयाचा निधी गावच्या विकासाठी मंजूर - निलेश देशमुख -

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत विविध रस्त्याच्या कामासाठी नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून तीस लाख रुपयांचा निधी तर राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या प्रयत्नातून तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती गावच्या महिला सरपंच सौ प्रियंकाताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी यांनी सांगितले आहे

तालुक्यातील बु.ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत विविध रस्त्यांच्या कामासाठी आमदार राजेश पवार यांच्या निधीतून तीस लाख रुपयांच्या निधी मधून पेवर ब्लॉक करण्यासाठी देण्यात आले आहे 

तर राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या विशेष प्रयत्नां मधून गावचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी हा एकंदरीत साठ लाख रुपयांचा निधी गावासाठी मंजूर करून घेतला सदरील तीस लाख रुपयांच्या निधी मधून सुद्धा गावातील पेवर ब्लॉकचे विकास कामे करण्यात येणार असल्याचे ही निलेश देशमुख यांनी सांगितले आहे

रुई बु.येथे आमदार राजेश पवार यांच्या तीस लाख रुपयाच्या निधी मधून हनुमान मंदिराच्या पटांगणात पेवर ब्लॉक करण्यात येत असून राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या प्रयत्नातुन तीस लाख मंजूर करण्यात आले या सुद्धा निधीतून गावा अंतर्गत रस्त्यानी पेवर ब्लॉक करण्यात येणार असल्यामुळे गाव चेक्का चक होण्यासाठी काही दिवस लागणार आहेत असी माहिती निलेश देशमुख यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments