Header Ads Widget

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे सोलापूर येथे अपघाती निधन. भावपूर्ण श्रद्धांजली

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील विविध पक्षातील राजकीय पुढाऱ्या कडून नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांना जड अंतःकरणाने नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे 

 मा. शिवराज पाटील होटाळकर :- माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर आपल्या शोक संदेशात म्हणाले की माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबाराव एंबडवार हे सच्चे राजकारणी होते त्यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच धक्का बसला त्यांच्या जाण्याने राजकारणातील एक चांगला हिरा गमावला त्यांना जड अंत : करणाने भावपूर्ण श्रद्धांजली

प्रा. रवींद्र पाटील चव्हाण :- राजकारणातील बुलंद तोफ माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे सोलापूर मार्गांवर  कार अपघातात निधन झाले त्यांच्या निधनाची वार्ता कळताच राजकारणातील विकास पुरुष काळाच्या पडद्या आड गेला अशा नेत्याच्या निधना बदल शोक संदेश व्यक्त देताना प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

मा. बालाजी बच्चेवार :- स्व.बाबराव एंबडवार यांच्या अपघाती निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली असून अनेक राजकीय मंडळींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांच्या पार्थिवावर कोल्हेबोरगाव येथे दिनांक २ जुलै २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यामुळे त्यांच्या कुटूंबात बच्चेवार परिवार सहभागी असल्याचा शोक संदेश मा. बालाजी बच्चेवार व्यक्त केला आहे 

मा.संभाजी पाटील भिलंवडे  :- माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांच्या अपघाताची व निधनाची दुःखत घटना कळताच मा. संभाजी भिलंवडे यांनी शोक संदेश व्यक्त करताना म्हणाले राजकारणातील सुज्जळ नेता गमावला त्या बदल त्यांच्या आत्म्यास सुख शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे 

मा.माणिकराव लोहगावे :- बिलोली तालुक्यातील आरळी जिल्हा परिषद गटातून मागील मागील काही वर्षाखाली आपली राजकीय कीर्त व जन सामान्य माणसात आपली ओळख निर्माण करणारे नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच धक्काच बसला त्यांच्या निधना बदल शोक व्यक्त केले व त्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे

मा. बालाजी मदेवाड :- राजकारणातील स्वच्छ व्यक्त मत्व असलेले माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांच्या निधनाने राजकारणात एक पोकळी निर्माण झाले ती पोकळी कधीच न भरून निघणारी नाही अशा शब्दात माजी सरपंच बालाजी मदेवाड यांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे

मा. श्रावण पाटील भिलंवडे :- नांदेडच्या बिलोली तालुक्यातील धुरंदर राजकारणी म्हणून ओळख असलेले कोल्हेबोरगाव येथील रहिवासी व नांदेड जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी अध्यक्ष बाबाराव जमनाजी एंबडवार यांचे अपघाती निधन पुणे सोलापूर हायवेवर सोलापूर पासून ४० किलोमीटर अंतरावर माळवत-चिखली या गावाजवळ १ जुलै २०२३ रोजी रात्री ११  वाजण्याच्या सुमारास त्यांची कार ट्रकला धडकली या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असल्यामुळे त्यांना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती दे ओ हीच जड अंतःकरणाने भावपुर्ण श्रद्धांजली -

 मा. वसंत पाटील सुगावे :- राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून आज ही त्यांची बिलोली तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात ओळख होती माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष  बाबाराव एंबडवार यांचे राजकीय वर्तुळात वजन होते त्यांच्या निधना बदल दुःख व्यक्त करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे 

Post a Comment

0 Comments