Header Ads Widget

नायगाव कडून नांदेडकडे जाताना पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या दौऱ्या दरम्यान घुंगराळा येथे लाल दिव्याच्या गाडीत निघाले जाबंळ्या देत -

         माधव पवार
अख्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा जगाच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस आपल्या शेतात काबाड कष्ट करतो आणि काळ्या मातीतून त्यांच्या कष्टाच्या माध्यमातून सोने पिकवतो अशा शेतकऱ्यांच्या पिकाची व नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड जिल्ह्याच्या दौरावर दिनांक २३ जुलै २०२३ रोजी आले आहे

जिल्ह्यातील देगलूर मुखेड बिलोली आदीसह अन्य तालुक्याचा दौरा करून नांदेडकडे घुंगराळा मार्गे जात असताना लाल दिव्याच्या गाडीत थकवा आल्याचे जाणवले आणि पालकमंत्री गिरीष महाजन यांनी कडाडून जाभंळी दिली असल्याचे घुंगराळा येथे  बाजार करण्यासाठी आलेल्या जनतेनी पाहिले आहे

जिल्यात सततच्या मुसळधार पावसामूळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे झाले असल्यामुळे एकीकडे शेतकरी हैराण असताना सुद्धा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नायगावा कडून नांदेड कडे जाताना एसीच्या गाडीत निघाले जाबंळ्या देत हे वास्तव चित्र दिसून आले आहे 

जिल्ह्याचा दौरा करून नायगाव कडून नांदेड कडे जात असताना मौजे घुंगराळा येथे धावत्या लाल दिव्याच्या गाडीत जांभळी दिले तर कारण दौरा करून थकवा आला असावा तर मग शेतकरी राजा आपल्या शेतात राब राब राबतो त्यांना विश्रांती कधी मिळत नाही  परंतु मंत्री संत्री यांना एसीच्या गाडीत बसून सुद्धा विश्रांती घ्यावी वाटते तर शेतकऱ्याच्या दुःखाचे निवारण कधी होणार असा प्रश्न चर्चेला जात आहे 


Post a Comment

0 Comments