Header Ads Widget

सावरखेड ते आंतरगाव रस्त्यावर कुत्र्याच्या हल्ल्यात हरिण ठार वन विभाग अधिकाऱ्याला कळून ही वेळेवर आले नसल्याने हरणाचा झाला मृत्यू

        माधव पवार 
वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर बिलोली यांच्या बेजबाबदार पणामुळे नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वन्य प्राण्याच्या संख्या मोठया प्रमाणात झाली असलेल्यामूळे हरण कधी कुत्र्याच्या तावडीत सापडून  तर कधी वाहनाच्या धडकेत सापडून मृत्यू मुखी पडत आहेत

अनेक वेळा वन विभागाच्या अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला कळवून सुद्धा हरणाचा बंदोबस्त करीत नसल्यामुळे हरणाचा मृत्यू होताना दिसून येते तशाच पद्धतीने अंतरगाव ते सावरखेड रस्त्यावर कुत्र्याच्या हल्ल्यात हरण प्रथम जखमी झाले होते वन विभागाच्या कर्मचाऱ्याला सदरची माहिती तलाठी संदीप पवार यांनी देऊन सुद्धा वेळेवर उपचार व घटनास्थळी भेट दिली नसल्यामुळे अखेर त्या हरणाचा मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक २३ जुलै २०२३ घडली आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात शेकडो हरणाचे कळप झालेले असताना सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर व बिलोली यांनी मोठ्या जंगलाच्या ठिकाणी सुरक्षितपणे हरणाच्या कळपाला नेऊन सोडत नसल्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांसह जनतेतून संताप व्यक्त केला जात असला तरी वन विभाग कर्मचाऱ्यांच्या डोळे झाक पणामुळे हरणावर अनेक कुत्र्यांचा हल्ला होताना दिसून येत दिसून येत आहे

तालुक्यातील आंतरगाव व सावरखेड रस्त्यावर  हरणाच्या कळपातील एका हरण कुत्र्याच्या तावडीत सापडले होते त्या कुत्र्याच्या हल्ल्यात उपचार मिळू जे पर्यंत हरणाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे

शेतकऱ्यांच्या शेतात हरणाचे कळप दिसतात त्या शेतात संबंधित गावातील कुत्र्याच्या कळप बघताच त्यांचा पाठलाग आठ ते दहा कुत्रे हल्ले चढवीत असल्याने हरणाला मृत्यू मुखी पडावे लागत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ व्यवस्था करून जंगलात सुरक्षितपणे सोडून द्यावे अशी मागणी होत आहे 



Post a Comment

0 Comments