राजकुमार पाटील मंगनाळे
नांदेड जिल्हा परिषद परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नवनियुक्त मीनल करनवाल यांनी कार्यभार स्वीकारला असून त्या शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी नांदेड जिल्हा परिषद येथे रुजू झाल्या आहेत
नांदेड जिल्हा परिषदच्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल ह्या रुजू झाल्या आहेत त्या यापूर्वी नंदुरबार येथे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत होत्या मीनल करणवाल ह्या २०१९ बॅचच्या आय. ए. एस. तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी असलेल्या वर्षा ठाकूर यांची लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात झाली आहे
नांदेड जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूरघुगे यांची पदोन्नती होऊन लातूर जिल्हा अधिकारी म्हणून बदली झाली आहे
नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी म्हणून त्यांनी बेटी बचाव बेटी पढाव व वृक्षारोपण या संकल्पनेने या ठिकाणी वेगळाच ठसा उमटवला होता त्यांची बदली लातूर येथे झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद नांदेडला परत एकदा महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करणनवाल यांनी पदभार स्वीकारला आहे
यांच्या ठिकाणी शासनाने मीनल करनवाल यांची नियुक्ती केली असून सदरच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेकडे जास्तीचे लक्ष देऊन शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची आवश्यकता असून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतले आहे
यावेळी नांदेड जिल्हा परिषद चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम आदी उपस्थित होते
नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी तथा मांजरम चे सुपुत्र डॉ. बालाजी शिंदे, नांदेड जिल्हा परिषदचे समाज कल्याण अधिकारी श्री सतेंद्र अऊलवार, नांदेड जिल्हा परिषद चे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू अंदुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अभय नलावडे, बालाजी नागमवाड तसेच जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

0 Comments