Header Ads Widget

उमरी तालुक्यातील सततच्या पावसाने झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करुन नुसकान भरपाई द्या - स्व माजी आमदार पुत्र कैलास देशमुख गोरठेकर


नायगाव / उमरी - नेटवर्क : नायगाव फास्ट न्यूज - 

उमरी तालुक्यात गेल्या दोन ३ दिवसापासुन संतत मुसळधार पावसामुळे अतिवुष्ठी होऊन तालुक्यातील हजारो हेक्टर वरील पिकांच अतोनात नुसकान झाले असुन शेकडो हेक्टर शेतीत पाणी घुसल्याने शेतातील माती पिके खरडुन गेली असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावा अशी स्व.माजी आमदार पुत्र कैलास देशमुख गोरठेकर यांनी मागणी केली आहे 

तालुक्यातील सखल भाग जलमय झाला होता या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सतत पावसामुळे नुसकान झालेल्या शेतीचे व पडझड झालेल्या घराचे तात्काळ पंचनामे करुन नुसकान भरपाई देण्याची मागणी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे पुत्र युवा नेते संचालक कैलास देशमुख गोरठेकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कडे केली आहे

उमरी तालुक्यात गेल्या दोन ते तिन दिवसा पासुन सलग मुसळधार पाऊस होत असल्याने तालुक्यातील अनेक भागात जलजिवन विस्कळीत झाले असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह उमरी तहसीलचे तहसीलदार यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पंचनामे करण्याचे आदेश द्यावे असे ही कैलास  गोरठेकर यांनी मागणी केली आहे 

ग्रामिण व उमरी शहरातील महादेव मंदीर परीसरातील अनेक दुकान व  घरामध्ये पाणी गेल्यामुळे मोठ्ये नुकसान दुकानदाराचे नुकसान झाले असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे चालू करावेत  अशी मागणी होत आहे

सततच्या पावसाने मोठे नुकसान झाल्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेतीत पाणी घुसुन पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे वास्तव चित्र उमरी तालुक्यात दिसून येत असून  सततधारा पावसामुळे ‌बांधित शेतीचे व पडझड  झालेल्या घराचे तत्काळ पंचनामे करून शेतक्यानां अर्थिक मदत देण्याची मागणी युवा नेते संचालक कैलास देशमुख गोरठेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे

Post a Comment

0 Comments