Header Ads Widget

"आता तुम्ही सांगा खासदार साहेब " वाटेगाव व गांजेगावचा पूल कधी बांधणार ? मराठवाडा - विदर्भ पुराने संपर्क तुटला दिलेले आश्वासन हवेतच विरले


हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

पैनगंगा गांजेगाव नदीवरील पूल पाण्याखाली विदर्भ मरठवाडाचा संपर्क तुटला वाटेगावच्या पुलासाठी २५ कोटी व गांजेगावच्या पुलाकरिता ३० कोठी रुपयाची पुलाची मंजुरी तर निधी कुठे गेला - ? खा. हेमंत पाटील यांच्यावर जनता नाराज असल्याचे या विभागतून बोलल्या जात आहे 
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून वाटेगाव पुलासाठी २५ कोटी रुपये तर गांजेगाव पुलासाठी ३० कोठी ? रुपयाचा असा एकंदरीत ५५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याचे सांगत दोन महिन्यात सदरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती परंतु अध्याप कामाला सुरवात करण्यात आली नसल्यामूळे गांजेगावचा पूल पाण्याखालीच गेला असल्याची माहिती आहे 
जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा गांजेगाव नदीवरील पूल पूर परिस्थितीमूळे पाण्याखाली गेला असल्यामुळे विदर्भ मरठवाडाचा संपर्क तुटला असल्याचे माहिती मिळते परंतु हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सदरच्या वाटेगाव आणि गांजेगाव पुलासाठी मंजूर करून आणलेला निधी कुठे गेला असा सवाल जनतेतुन केला असून निधी मंजूर झाला तर बांधकाम करण्यात आले असा सवाल ही यावेळी होताना ऐकावयास मिळत आहे 
विदर्भ मराठवाड्याच्या ढाणकी गांजेगाव हिमायतनगर पैनगंगा नदीवरील पुल पाण्याखाली  गेला असल्यामुळे वाहतुक पुर्ण पणे ठप्प असल्याचे सांगण्यात येते ढाणकी गांजेगाव पळसुपर हिमायतनगर या पैनगंगा नदीवरील नवीन पूल मंजुर करावा या मागणीसाठी  हिगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही खासदारानी नवीन पुलासाठी आणलेला निधी गांजेगावच्या पाण्यात आडकला की काय ? असा प्रश्न चर्चेला जात आहे 

" खासदार साहेब दिलेले आश्वासन कधी पूर्ण होणार ? "

वाटेगाव व गांजेगाव पण आश्वासन देऊन ही  पुल मंजुर झाले नाही या भागातील जनता त्याच्यांवर  नाराज आसल्याची दिसत आहे  ढाणकी ,गांजेगाव  डोल्हारी पळसपुर सिरपली,    येथिल   जनतेच्या बोलण्यातुन ऐकण्यास मिळत आहे

Post a Comment

0 Comments