Header Ads Widget

कारेगाव ,रांजणगाव या परिसरामध्ये अवैध धंदे दिवसें दिवस वाढत असताना कोणाचे ही लक्ष राहिले नसल्यामूळे तात्काळ दखल घ्यावी निवेदनाद्वारे मागणी


नायगाव फास्ट न्यूज : थेट पुणे :-:

पंचतारांकित रांजणगाव एम.आय.डी.सी मुळे शिरूर, कारेगाव,रांजणगाव, ढोकसांगवी येथील नागरीकरण झपाट्याने वाढत असून त्याच बरोबर शिरूर ,कारेगाव ,रांजणगाव या परिसरामध्ये अवैध धंदे दिवसेंदिवस वाढतच असून त्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही 

विशेषता:शिरूर,कारेगाव या गावांमध्ये टपरीवर छोटे-मोठे दुकाने थाटून 'बालाजी" नामे (ऑनलाइन ऍप)"ऑनलाईन लॉटरी "जीएसटी चालू आहे अशी बतावणी करून कमी रक्कमेत खूप पैसा कमवण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांना फसवून त्यांच्या अधिकार क्षेत्रात पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन उघडपणे सर्रास धंदे चालू आहे
टपरीवर उघडपणे विकले जाणारे पेट्रोल,गुटखा विक्री, हातभट्टी विक्री, बिअर शॉपीमध्ये विकली जाणारी दारू, घरगुती गॅस टाकीचा व्यवसाय, वेश्याव्यवसाय यांचे प्रमाण शिरूर, रांजणगाव कारेगाव, एमआयडीसी या गावांमध्ये दिवसेंदिवस वाढत असून अनेकांचे संसार येणाऱ्या काळामध्ये देशोधडीला लागणार आहे

हे नक्कीच त्यामुळे आपण या सर्व बाबीचा आपण गांभीर्याने विचार करून शिरूर,कारेगाव,रांजणगाव एम.आय.डी.सी आणि आपल्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये कायदा आणि सु-व्यवस्था अबाधित राहावी सदरच्या निवेदनातं म्हटले आहे
असे म्हणून या गावातील अवैद्य धंदे याला अटकाव करावा आणि सर्व नागरिकांना योग्य असा दिलासा द्यावा अशी विनंती संबंधित अधिकारी वर्गाला मागणी केली आहे

या साठी आम आदमी पार्टी शिरुर *अध्यक्ष-अनिल डांगे,आप कार्यकर्ते-राजू संगारे यांनी वेळोवेळी पोलीस महासंचालक,पोलिस निरीक्षक पुणे पाषाण डी वाय एस पी कार्यालय रांजणगाव एम.आय.डी.सी,रांजणगाव पोलीस स्टेशन,शिरूर पोलीस स्टेशन , प्रांत अधिकारी-हरेश सुळ साहेब यांना निवेदन,पुरावे दिलेले आहेत
                     
शिरुर-हवेली आमदार,खासदार यांनाही फोन वरून माहिती दिलेली असून आता नेमके प्रशासन काय भूमिका घेते याच्यावर आम आदमी पार्टी शिरुरचे लक्ष असून आप पार्टी वरिष्ठांच्या आदेशानुसार आंदोलनाची दिशा ठरवणार असून संबंधित विभागाने कारवाईन केल्यास लोकहितासाठी लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या  दारात आंदोलन करण्यास परवानगी दयावी.. अशी मागणी केली आहे

 

Post a Comment

0 Comments