बिलोली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील हांडे यांचा पुढाकार बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिर बिलोली सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश पाटील हांडे यांच्या पुढाकारातून व भाजपाचे सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते
दिनांक २० जुलै शुक्रवार रोजी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत पार पडलेल्या मोफत शिबिराचा लाभ कासराळी गावासह परिसरातील असंख्य गरजू नागरिकांनी घेतला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत ९७२ उपचार आणि १२१ पाठपुरावा सेवा समाविष्ट केलेल्या आहेत.
या योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिरात कॅन्सर, जठर व आतडे शस्त्रक्रिया, छाती व फुफ्फुस आजारावरील उपचार मूत्रपिंड व मूत्र मार्ग विकार बालरोग शास्त्रक्रिया नाक कान घसा अस्तिव्यंग जनरल सर्जरी न्यूरोसर्जरी मेंदूवरील शस्त्रक्रिया दंतरोग छाती दमा हृदयरोग
आर्थोपेडिक सर्जरी हृदयावरील सर्जरी जनरल मेडिसिन दुर्बीण द्वारे पोटाचे शस्त्रक्रिया स्त्रीरोग इत्यादी आजारावर नांदेड येथील अपेक्षा मल्टी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते मोफत तपासणी करण्यात आले आहे.
या शिबिरात वरीलपैकी ज्या व्याधी चे निदान झाल्यास योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयात उत्तम प्रकारची मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. या योजनेअंतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे
अशा कुटुंबाच्या दारिद्र्यरेषेखालील पिवळ्या शिधापत्रिका धारक अंत्योदय व अन्नपूर्णा पात्रधारक तसेच दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक) या योजनेत समावेश आहेत
व सदरील शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी माहिती शिबिरात देण्यात आली आहे.

0 Comments