बिलोली तालुक्यातील गुरुवारी तब्बल दहा ते बार तास मुसळधार पावसाने झोडपल्याने अक्षरशः गोरगरिबांच्या घराच्या संसाराची राखरांगोळी होऊन बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी जवळ कराल व बोळेगाव, येथील घराची पडझाड झाली आहे
देगलूरचे भूमिपुत्र दिपक कांबळे यांनी खानापूर ते कुंडलवाडी परिसरसह विविध भागाची पाहणी करून संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करून सामाजिक बांधलीक जोपासून लोकाभिमुख उपक्रम राबविल्याने तेथील जनतेने कुठल्याही पदावर नसणाऱ्या दिपक कांबळे रामपूरकरांच्या कार्याची स्तुती केली.
दरम्यान गुरुवारी रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून मध्यरात्री बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी जवळ असलेल्या कराल व बोळेगांव वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले त्यात अनेकांच्या घराचे नुकसान व पडझाड झाली आहे
त्यामध्ये बोळेगांव येथील माधव गंगाधर बतुलवार, सुनिता भुमा गोठेकर,राजाबाई टेकवाड,मोगलाजी सायबु शिंत्रे,लालू शिंत्रे तर कुंडलवाडी जवळ असलेल्या कराल येथील बाबू बसवंडा मुद्दलवार, गंगाबाई वाघमारे या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असुम यामध्ये अनेक निराधार महिलांचा घराचा समावेश आहे.
तसेच ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने बिलोली तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात आला आहे
डबल पेरणीमुळे शेतकऱ्यांची अडचणी वाढल्यामुळे प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात ध्यावा अशी आशावादी मागणी देगलूरचे भूमिपुत्र दिपक कांबळे रामपूरकरांनी यांनी केली यावेळी प्रशांत हेळगिरी,विलास पाटील इंगोले,कैलास साखरे आदींची उपस्थिती होती

0 Comments