Header Ads Widget

पालकांची खासगी व्यवस्थापनांच्या शाळेला पसंती असताना जालण्याच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी दिला आपल्या मुलाना अंगणवाडीत प्रवेश - कौतुकास्पद निर्णय -


नायगाव फास्ट न्यूज : थेट जालना / नांदेड -

महाराष्ट्र राज्याच्या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अतिशय सुंदर निर्णय घेतला असून ते पालकांसाठी लाभ दायक ठरणारा  असल्यामुळे राज्यातील अशाच पद्धतीने सर्व अधिकाऱ्याच्या मुला मुलीना जर अंगणवाडी अथवा जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश दिला आहे

तर नक्कीच शिक्षणाचा दर्जा सुधारुन दर्जेदार शिक्षण मिळेल यात काही शंका नाही आपला मुलाचे शिक्षण प्रथम अंगणवाडीत झाले पाहिजे या हेतूने मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी मुलांना अंगणवाडीत प्रवेश दिला आहे

राज्यातील जालना जिल्ह्याचा पॅर्टर मुखकार्यकारी यांचा राबविला तर जिल्हा परिषद शाळेचे व अंगणवाडीचे भविव्य उजळून निघेल राज्याचा ग्रामीण भागाचा इतिहास पाहिला तर गोरगरीब असो की श्रीमंत मंडळी असो की अधिकारी असो अथवा शिक्षक वर्ग असो त्यांचे मूले जिल्हा परिषद शाळेत अथवा अंगणवाडीत शिक्षण घेत नाहीत ते थेट इंग्रजी शाळेत पैसे भरून प्रवेश दितात परंतु शासकीय शाळेत टाकत नाहीत हीं दुर्दैवी बाब आहे 

जालना जिल्ह्याच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षाताई मीना यांचा मुलगा अंगणवाडीच्या माध्यमातून शिक्षण घेत असल्यामुळे या जिल्ह्यात अंगणवाडीचा मोठा दर्जा सुधारणार असून तशाच पद्धतीने पालकानी आपल्या सुद्धा लहान मुलाच्या शिक्षणाची सुरुवात जर अंगणवाडीतुन केली तर एक शिक्षणाला दर्जेदार दिशा मिळेल असा अशी अपेक्षा सदरच्या मुख्यकार्यकारी वर्षाताई मीना केली असावी असा प्रश्न पडतो आहे 

जिल्हा परिषद जालण्याच्या सीईओ वर्षा मीना यांनी आपल्या मुलाना येथील असलेल्या दरेगाव अंगणवाडीत प्रवेश देऊन आदर्श निर्माण केला आहे

अशाच पद्धतीने नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ श्रीकर परदेशी यांनी जिल्हात कॉपी मुक्त अभियान राबवून परीक्षा घेतल्या होत्या व सदरचा सदरचा कॉपी मुक्तीचा पॅर्टर अख्या राज्यात राबविण्यात आला होता डॉ परदेशी हे जिल्ह्यातील आदर्श  नामांकित झाले होते तशाच पद्धतीने जालण्याच्या मुखकार्यकारी अधिकारी वर्षाताई मीना यांनी एक आदर्श निर्माण केला आहे 

 



Post a Comment

0 Comments