मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पेनगंगा नदीच्या पात्रात एक विवाहित महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना दिनांक २३ जुलै २०२३ रोजी घडली असून सदरील घटनेच्या संदर्भात विविध चर्चेला उधाण आले आहे
सदरची विवाहित महिला ही पतीसह तिचे दोन लहान मुलाच्या सोबत माहेरून म्हणजे परजना येथून हिम्मतनगरला येत असताना सदरची विवाहित महिला ही हिमायतनगर तालुक्यातील बोरी पुलावरून नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव येथे मजेत विवाहित महिला तिचा पती अमोल पतंगे सोबत असल्यामुळे पतंगे हा त्यांच्या कुटुंबासह सासरवाडीला धोंडे खाण्यासाठी आला होता असे सांगण्यात येत आहे
परजना तो घराकडे परतत असताना त्यांची पत्नी सौ माया अमोल पतंगे ही हिमायतनगर तालुक्याच्या बोरी पुलावरून वाहून गेल्याची घटना घडली असताना संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले होते
मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पेनगंगा नदीत विवाहित महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडल्याच्या नंतर त्या घटनेला वेगळेच स्वरूप येत असल्यामुळे या घटनेत नेमके घडले काय यांच कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती मिळते आहे
विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या हिमायतनगर तालुक्याच्या बोरी पुलावरून वाहून गेलेल्या विवाहित महिलेच्या नातेवाईकासह प्रशासनाकडून सदरच्या महिलेची शोध मोहीम सुरू आहे

0 Comments