भारत जोडो यात्रे दरम्यान नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची तुफानी यात्रा निघाली होती त्या यात्रेच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागासह इंदोर काहाळा कल्याण टोल नाक्याच्या यंत्रणेने लाखो रुपयाचा खर्च केले आहे
सदरच्या भारत जोडो यात्रे दरम्यान काही अडचण येऊ नये म्हणून रस्त्याच्या बाजूचे झाडे झुडपे तोडून जागोजागी चून्याने पट्ट्या मारले रस्त्याच्या साईटला असलेल्या झाडाला सुद्धा रंगरंगोटी करून दाखवून दिले आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या नरसी चौकामध्ये रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्याच बरोबर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे या राज्य महामार्गाची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्या सारखी होऊ लागली असल्याचे चित्र वास्तव दिसून येत आहे
सदरचे खड्डे व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागासह कल्याण टोल नाका काहाळा यांनी खड्डे लेवल नाही केल्यास सदरचा टोल नाका बंद करण्याची वेळ जनतेवर वास्तव आणि सत्य आलेली आहे
सार्वजनिक बांधकाम विभागासह कल्याण टोल नाका धारकांनी भर पावसाळा चालू झाला असताना सुद्धा रस्त्यावर कुठे झाडे लावल्याचे दिसून येत नसून सदरच्या मार्गावर प्रवासी निवारा नसल्यामुळे प्रवास करणाऱ्या लोकांना नाहक त्रास जाणवत असताना दिसून येत आहे
या राज्य महामार्गावर बऱ्याच ठिकाणी गतिरोधक बसवले नसल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे
नायगाव येथे प्रवासी निवारा बांधला असला तरी त्या निवाऱ्यात दहा ते पंधरा लोक बसत नाहीत अशा पद्धतीचे सदरचे प्रवाशी निवारे बांधण्यात असले तरी घुंगराळा कृष्णुर काहाळा बस स्टैंड वर प्रवासी निवारा बांधला नसल्यामुळे प्रवासाना अनेक आडचनीचा सामना करावा लागत आहे
देगाव येथे करण्यात आलेला प्रवासी निवारा केवळ टीना पत्रे टाकले असले तरी ते गेल्या अनेक महिन्या पासून वाकून गेले असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग नायगाव व कल्याण टोल नाका यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोणते ही प्रवासी या ठिकाणी बसण्यास धजावत नाहीत असे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे
सदरच्या राज्य महामार्गाची अवस्था खेड्यापाड्यातील रस्त्यासारखी होत असल्याने वेळीच लक्ष देण्याची गरज भासत आहे

0 Comments