Header Ads Widget

नायगाव तालुक्यात सततधार पावसामुळे देगावचा संपर्क तुटला तर अन्य भागात तहसीलदार मंजूषाताई भगत यांची पाहणी

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात दिनांक २६ जुलै २०२३ पासून  सतत धार पाऊस पडत असल्यामुळे परत एकदा नायगाव तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी नुकसानीची देगांव येथे पाहणी केली आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गा पासून जवळच असलेल्या पूर्वेला देगाव येथील गावाचा पुरामुळे संपर्क तुटला असल्याने स्वतः तहसीलदारानी पाहणी केली असून इतर ठिकाणच्या दौऱ्यावर असून तालुक्यात धुवाधार पाऊस पडत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे
नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय करण्यासाठी नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी चिळंधार पावसात देगाव येथे संपर्क तुटलेल्या भागाची पाहणी आहे

येथील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतीची ही पाहणी केली आहे

Post a Comment

0 Comments