तब्बल पाच दिवसांनी पेनगंगा नदी पात्रात मिळाली डेड बॉडी ठिकाण डोलारी येथील सरपंच तुकाराम माने यांच्या शेताजवळ अशी माहिती डोलारी येथील सरपंच तुकाराम माने यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
पीएसआय जाधव मॅडम के बी कांगणे मॅडम महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार आदी वेळी घटनास्थळी हजर होते
मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पेनगंगा नदीच्या पात्रात एक विवाहित महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना दिनांक २३ जुलै २०२३ रोजी घडली होती सदरील घटनेच्या संदर्भात विविध चर्चेला उधाण हीं आले होते
सदरची विवाहित महिला ही पतीसह तिचे दोन लहान मुलाच्या सोबत माहेरून म्हणजे परजना येथून हिम्मतनगरला येत असताना सदरची विवाहित महिला ही हिमायतनगर तालुक्यातील बोरी पुलावरून नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना घडली होती
जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव येथे मजेत विवाहित महिला तिचा पती अमोल पतंगे सोबत असल्यामुळे पतंगे हा त्यांच्या कुटुंबासह सासरवाडीला धोंडे खाण्यासाठी आला होता असे सांगण्यात येत होते
परजना तो घराकडे परतत असताना त्यांची पत्नी सौ माया अमोल पतंगे ही हिमायतनगर तालुक्याच्या बोरी पुलावरून वाहून गेल्याची घटना घडली असताना हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बि डी भूसनूर यांच्यासह पोलीस ठाण्याचे कुलकर्णी, नागरगोजे यांच्यासह आदी कर्मचारी घटनास्थळी रवाना होऊन प्रेत घेतले आहे
मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पेनगंगा नदीत विवाहित महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडल्याच्या नंतर त्या घटनेला वेगळेच स्वरूप येत असल्यामुळे या घटनेत नेमके घडले काय यांच कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती मिळली नव्हती
विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या हिमायतनगर तालुक्याच्या बोरी पुलावरून वाहून गेलेल्या विवाहित महिलेच्या नातेवाईकासह प्रशासनाकडून सदरच्या महिलेची शोध मोहीम सुरू होती परंतु अखरे सदरच्या महिलेचे प्रेत सापडले आहे

0 Comments