Header Ads Widget

नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बळेगाव बंधाऱ्याचे दरवाजे बंद केल्या शिवाय मच्छीमारानी गोदावरी पात्रात उतरू नये : तहसीलदार मंजुषाताई भगत

               माधव पवार
नांदेड जिल्ह्यात दिनांक २० जुलै २०२३ पासून सतत  मुसळधार पाऊस पडत असल्यामूळे पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या बळेगाव बंधाऱ्याचे दरवाजे बंद केल्या शिवाय कोणत्या ही मच्छीमारांनी मच्छी पकडण्यासाठी गोदावरीच्या पात्रात उतरू नये असे आवाहन नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार मंजुषाताई भगत यांनी केले आहेनायगाव तालुक्यातील बळेगाव गोदावरी पात्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना सुद्धा सूचित करण्यात येते की सध्याची पूर परिस्थिती पाहता कोणत्याही नागरिकांनी प्रवास करीत असताना पुरातून कोणी ही प्रवास करू नये असा इशारा ही नायगावच्या   कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केल्या आहेत तालुक्यातील एकूण ८९ गावे असल्यामुळे अनेक गावाला जाण्यासाठी नदी नाले ओढे वाटत असल्याने सध्याची परिस्थिती मुसळधार पावसाने गंभीर बनत असल्यामूळे वाहन धारकासह जनतेने रात्री बे रात्री प्रवास करू नये असा महत्त्वाचा इशारा नायगावच्या तहसीलदार मंजूषाताई भगत यांनी दिला आहे

तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कुठे रात्री बे रात्री पूर परिस्थिती निर्माण झाल्यास  प्रशासनाला कळविण्यात यावे असे आवाहन यावेळी तहसीलदार यांनी केले आहे 

नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बळेगाव बंधाऱ्याचे दरवाजे बंद केल्या शिवाय मच्छीमारानी गोदावरी नदी पात्रात उतरू नयेत असा असे तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी कळविले आहे 

Post a Comment

0 Comments