जिल्ह्यात गेल्या २० जुलै २०२३ रोजी पासून सततचा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सदरच्या पावसाने महाराष्ट्र शासनाची चांगलीच झोप उडविली असल्यामुळे सर्वत्र जिल्ह्यात पूर परिस्थिती व शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदर बाब गांभीर्याने लक्षात घेऊन धर्माबाद तालुक्यासह अन्य तालुक्यांचा दौरा करत असल्यामुळे शेतकरी म्हणतात शासन आपल्या बांधावर आले असल्याचे शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी धर्माबाद तालुक्याचा दौरा केला असल्यामुळे त्यांच्या कडून अधिकची माहिती घेण्याचा संपर्क करून प्रयत्न केला असता काही तरी त्यांच्या प्रशासकीय कारणास्तव त्यांनी फोन उचलू शकले नाहीत परंतु जिल्हाधिकारी यांची तळमळ पाहता नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सदरच्या शेतकऱ्यांसह जनतेतून बोलला जात आहे
जिल्ह्यातील नायगाव उमरी धर्माबाद बिलोली देगलूर मुखेड तालुक्यात सर्व अधिक मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असल्यामुळे त्यांच्या शेतातील पिके पुराच्या पाण्याने वाहून गेली असल्यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या नुकसानचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या विविध क्षेत्रातुन होत असून नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी तालुक्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे

0 Comments