महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षा पासून काँग्रेस पक्षात काम करत असणारे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव ८९ विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी असे म्हणले की सन २०२४ मध्ये राज्याची सत्ता महाविकास आघाडीच्या हाती असणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे
आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी पक्ष बदलीची खळबळ उडाली असली तरी येणाऱ्या आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यासह गोरगरीब जनतेच्या विचाराच सरकार असणार असल्याचे ही नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले
राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्यामुळे २०२४ वर्षात राज्याच्या हितासाठी व जनतेसाठी आणि विकासासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हा अध्यक्ष काँग्रेस अनुसूचित जाती प्रचार्य मनोहर पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्याची निवडी मोठया करण्यात येत आहेत

0 Comments