माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करणारे धूप्पा येथील जेष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते माधवराव कंधारे यांची नुकतीच काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाउपअध्यक्ष पदी निवड झाल्यामूळे खतगावकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आहे
येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागत असल्यामुळे नांदेड जिल्हात काँग्रेस पक्ष दणकट करण्यासाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी माधवराव कंधारे यांच्यावर मोठा विश्वास ठेवून त्यांची नांदेड ओबीसी सेल जिल्हाउपअध्यक्ष पदी निवड केली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे धूप्पा येथील माधवराव लक्ष्मणराव कंधारे यांनी अनेक वर्षा पासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठ पणे काम करत असल्यामूळे त्यांच्या कार्याची दाखल घेऊन महाराट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुचने नुसार माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी माधवराव कंधारे यांची काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा उपअध्यक्ष पदी निवड झाल्यामूळे त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे

0 Comments