नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील गडगा येथील रहिवासी असलेल्या धोंडीबा कळसे यांचे चिरंजीव माधव धोंडीबा कळसे यांनी पोटाच्या गंभीर आजाराला कंटाळून मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या वर मुंबई येथून त्यांचे प्रेत गडगा येथे आणण्यात आले त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे
गडगा येथील त्यांच्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे
नायगाव तालुक्यातील गडगा येथील रहिवासी असलेले धोंडीबा कळसे यांचे पुत्र माधव धोंडीबा कळसे यांनी पोटाच्या आजाराला कंटाळून मुंबई येथे आत्महत्या केल्याच्या नंतर त्याच्या कुटुंबावर जे संकट कोसळलं त्या संकटास दूर करण्यासाठी व दुःखात सहभागी होण्यासाठी सदरच्या गरीब कुटुंबाच्या आर्थिकदृष्ट्या लक्षात घेऊन दान शूरानी पुढे येण्याची गरज आहे
समाजातील दानशूर मंडळी व राजकारणी मंडळींनी त्यांच्या परिवारास आर्थिक मदत करावी असे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून अनेकानी मागणी केली आहे
तालुक्यातील गडगा या गावचे मयत माधव धोंडीबा कळसे यांना पोटांचा भयंकर त्रास होता अनेक दवाखान्या मध्ये त्याने उपचार करून अखेरचा पर्याय म्हणून मुंबई येथे त्यांनी उपचार घेण्यासाठी गेले होते अखेर त्यांच्या पोटाच्या आजाराला कंटाळून मयत माधव धोंडीबा कळसे यांनी मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी घडली आहे
सदरील घटनेची दुर्दैवी माहिती गडगा येथे कळताच गावावर शोककळा पसरली होती त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात संस्कार करण्यात आले आहे

0 Comments