Header Ads Widget

गुटखा बंदी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नायगाव तालुक्यासह शहरात चालतो गुटखा तेजीत " मग " तर डोळ्यावर पट्टी कोणाच्या ? -


नायगाव : मधुकर जवळे - 

महाराष्ट्र शासनानी गेल्या अनेक वर्षा पासून राज्यात गुटखाबंदी कायदा लागू केला असला तरी ते फक्त नावाचं बंद करण्यात आला असल्यामुळे सदरच्या गुटखा बंदीचा कायदा व नियम धाब्यावर ठेवून गुटखा धारका कडून गुटखा मोठा प्रमाणात नायगाव तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे

सदरच्या गुटखा धारकावर आळा बसविण्यासाठी संबंधित विभाग अधिकाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी का ? असा प्रश्न जनसामान्य माणसातून केला जात आहे

नायगाव तालुक्यासह शहरात गुटख्याची विनापरवाना विक्री होताना सर्रास पणे दिसून येत असताना सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकारी डोळे झाकून बसले असा ही प्रश्न चर्चाला जाताना ऐकावयास मिळत आहे

सदरचा गुटखा तेजीत चालत असल्याचे चित्र दिसून येत असून संबंधित विभागाचे अधिकारी नांदेड येथे राहतात आणि स्थानिक पोलिसांना सदरच्या गुटख्यावर धाडी मारून कारवाई कराव्या लागतात तर मग गुटखाबंदीचे अधिकारी नेमके करतात तरी काय ? असा सवाल सुद्धा जनसामाने माणसातून केला जात आहे

राज्यात गुटखा बंदी असताना सुद्धा सदरचा गुटखा गुटखा किंगच्या माध्यमातून येतो तरी कुठून असा ही प्रश्न जनसामान्य माणसाला भेडसावत असला तरी राज्यात येणारा मोठ्या प्रमाणात गुटखा ग्रामीण भागासह खेड्यापाड्यात त्यांची विक्री केल्या जाते आहे

याकडे गुटखा बंदी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कशामुळे होतो असं ही प्रश्न जन सामान्य माणसाला पडला असला तरी शहरात व तालुक्यात होणारा विनापरवाना गुटख्याची विक्री कधी थांबणार असा प्रश्नही चर्चेला जाताना ऐकवयास मिळत आहे 

Post a Comment

0 Comments