Header Ads Widget

राजकीय पक्षाची वाट आणि नेते सत्तेत सावधान पक्षश्रेष्ठीनो उमेदवारी देताना पाच वर्षासाठी कोर्टा मार्फत उमेदवाराचे शपथ पत्र घ्या - पक्षाचा घात टळेल ?- जनतेचा सवाल !!

        माधव पवार 
राज्यातल्या कोणत्या ही राजकीय पक्षाला दोष देऊन चालणार नाही सत्तर ते ७५ वर्षा पासून लोकशाही पद्धतीने देशात असो की राज्यात पाच वर्षाला निवडणुका होतात आणि जनता डोळे झाकून पक्षाला पाहून उमेदवार कसा ही असो त्यांना निवडणुकीत निवडून देतो आणि आपला नेता आपल्यासाठी काही तरी योजना आणेल व विकास करील या आशेने पाच वर्षा त्यांच्याकडे पाहतो आहे

सन २०२४ मध्ये होऊ घातलेल्या आगामी काळातील लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील  कोणता ही पक्ष असो त्या पक्षा कडून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारा कडून कोर्टाच्या मार्फत शपथ पत्र  पाच वर्षा करिता लिहून घेतले पाहिजे कारण मी ज्या  पक्षा कडून निवडणुकीत निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्या पक्षात जाणार नाही व मतदारासह पक्षाचा आणि जनतेचा विश्वास घात करणार नाही असे स्पष्ट शब्दात लिहून घेणे गरजेचे आहे

ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच पदाची नेमणूक थेट जनतेतुन केल्या जाते तर महाराष्ट्राच्या मुखमंत्र्याची थेट जनतेतून निवड का ? होऊ नये  आगामी काळातील राज्याच्या मुख्यमंत्र्याची निवड थेट जनतेतूनच झाली पाहिजे ही महत्वाची मागणी आहे 

ज्या पक्षातुन निवडून येईल त्या पक्षात पाच राहीन नाही राहिल्यास राजीनामा देऊनच दुसऱ्या पक्षात प्रवेश करिन अशा पद्धतीचे कोर्टाच्या मार्फत शपथ पत्र लिहून घेऊनच उमेदवारी राज्यातील पक्षाच्या वतीने देण्यात यावी असे जनतेतुन सवाल व्यक्त केला असून राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता येईल ते विकासाठी योग्य असेल असे सदरच्या जनतेतून बोलल्या जातं असून एका पक्षात निवडून येत आहेत तर पक्षाची वाट लावून दुसऱ्या पक्षात जाऊन सत्तेत दिसत असल्यामुळे राज्याची विकासाची चांगलीच वाट लागत आहे 





Post a Comment

0 Comments