महाराष्ट्र राज्यातले राजकारणात अतिशय ढवळाढवळीचे झाले असल्यामुळे व येणाऱ्या आगामी काळातील २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या कडून आढावा बैठकी घेतल्या जात आहेत
युवा नेतृत्व प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी या सदरच्या बैठकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनो तयारीला लागा असे आवाहन करण्यात येत आहे
राज्यात महाविकास आगाडी पूर्वी सत्तेत होती आणि या पुढे हे सुद्धा असणार असल्यामुळे त्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा विरोधका समोर संघर्ष करावा लागणार आहे
माजी आमदार पुत्र प्रा.रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षांच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करत आहेत त्यावेळी हे २०२४ च्या निवडणुकीचे लक्ष केंद्रित करून सदरच्या कार्यकर्त्यांना आवाहन करत आहेत
नायगाव विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाची फळी मजबूत करण्यासाठी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षा पासून काँग्रेस पक्षात काम करणारे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी या मतदार संघात आढावा बैठका घेत आहेत
काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्यासाठी आता पासूनच तयारीला लागा असे आवाहन प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना केले आहे

0 Comments