Header Ads Widget

निर्भीड पत्रकारांचा आज दिनांक १० जुलै २०२३ रोजीच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा !!

       माधव पवार
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील रहिवासी असलेले व अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे त्याच बरोबर नायगाव फास्ट न्यूजचे विशेष तालुका प्रतिनिधी व निर्भीड पत्रकार नागोराव संभाजीराव शिंदे यांचा आज दिनांक १० जुलै २०२३ वाढदिवस असल्यामूळे त्यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी नायागांव फास्ट न्यूजच्या माध्यमातून विशेष लेख ऑनलाईन प्रकाशित करण्यात आला आहे
पत्रकारितेचे माध्यम म्हणजे जनसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम असते अन्याय अत्याचाराववर मात करण्यासाठी त्याच्या बरोबर वाचा फोडण्यासाठी पत्रकारांचे मोठे योगदान असते त्या योगदानातून पत्रकारांच्या लेखणीचा बुलंद आवाज द्विगुणीत करण्यासाठी हिमायतनगर तालुक्याचे व नायगाव फास्ट न्यूजचे विशेष तालुका प्रतिनिधी नागोराव संभाजीराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातून अभिनंदनचा व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे
तालुक्यातील पळसपुर येथे राहणाऱ्या व हिमायतनगर तालुक्याचे विशेष प्रतिनिधी म्हणून नायगाव फास्ट न्यूज मध्ये काम करत असलेल्या नागोराव शिंदे यांचा वाढदिवस चांगल्या प्रकारे त्यांचे मित्र मंडळी व शिंदे परिवार साजरा करीत आहेत 

पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना पत्रकाराला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा समाज हितासाठी व राजकीय पुढाऱ्यांना तसेच विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिशा दाखविण्याचे काम पत्रकार करत असतो अशा पत्रकारांचा वाढदिवस आज साजरा होत आहे

पळसपुर येथील रहिवासी असलेले नागोराव शिंदे यांचा आज ४३ वा वाढदिवस साजरा होत असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा व अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा - 

Post a Comment

0 Comments