Header Ads Widget

नांदेड ते हुस्सा जनतेसह विध्यार्थाच्या सेवेसाठी लाल परी लवकरच धावणार विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नाला यश - वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्याच्या पथकाने केला रस्त्याचा सर्व्हे - बाबासाहेब हंबर्डे यांची माहिती -

       
         माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्याकडे तालुक्यातील हुस्सा नगरीचे बाबासाहेब हंबर्डे यांनी नांदेड ते धनज मेळगाव हुस्सा कुंटूर मार्गे बस सेवा चालू करण्यात यावी म्हणून विद्यमान आमदार पवार यांच्याकडे मागणी लावून धरली होती

त्या मागणीची दखल घेऊन आमदार राजेश पवार यांनी
या मार्गावर जनतेसह विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी तात्काळ लाल परी चालू होत असल्यामूळे लवकरच धावणार असल्याचे बाबासाहेब हंबर्डे यांनी सांगितले आहे

या संदर्भात आमदार राजेश पवार यांनी नांदेडच्या वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्याना सूचना दिल्या आहेत त्या सुचनेची दखल घेऊन नांदेडच्या वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनी सदरचा रस्त्याचा सर्वे केला असल्यामुळे लवकरच या मार्गावर राज्य परिवहन महा मंडळाची लाल परी जनतेच्या व विध्यार्थाच्या सेवेत रुजू होणार असल्याचे बाबासाहेब हंबर्डे यांनी सांगितले आहे

विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असल्याची ही बाबासाहेब हंबर्डे हुस्सेकर यांनी सांगितले नांदेड ते हुस्सा लवकरात लवकर चालू बस सेवा चालू होण्यासाठी व जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या सेवेत येण्यासाठी आमदार पवार यांनी जास्तीचे प्रयत्न केले असल्याचे बाबासाहेब हंबर्डे यांनी सांगितले आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्याकडे मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत बाबासाहेब हंबर्डे यांनी आमदार राजेश पवार यांचे शिफारस पत्र लावून नांदेडच्या वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्याला दिलेल्या नुसार या मार्गावर जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी लवकरच बस सेवा चालू होणार असल्याची बाबासाहेब हंबर्डे यांनी माहिती दिली आहे

नायगाव तालुक्यातील हुस्सा हे गाव गंगा पट्टीच्या अंतर्गत येत असल्यामुळे ह्या मार्गावर रात्री बे रात्री येण्यासाठी जनतेला प्रवासाचे कोणतेच साधन नसल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन सदरची लाल परी चालू करण्यात यावी म्हणून विद्यमान आमदार राजेश पवार यांच्याकडे मागणीचा पाठपुरावा बाबासाहेब हंबर्डे यांनी केला आहे

आ.राजेश पवार यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असल्याने या मार्गावर लवकरच बस सेवा चालू होणार असल्याची माहिती बाबासाहेब हंबर्डे हुस्सेकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे 


Post a Comment

0 Comments