Header Ads Widget

टाकळी गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या शंकरनगर ते बेटमोगरा रस्त्याच्या सीसी रोडचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर गुत्तेदाराच्या विरोधात नागरिकांचे अमरण उपोषण

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या शंकरनगर ते बेटमोगरा रस्त्याच्या सीसी रोडचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर गुत्तेदाराच्या विरोधात नागरिकांचे अमरण उपोषणास नागरिक बसले आहेत 
तालुक्यातील टाकळी बु येथील शंकरनगर ते बेटमोगरा जाणाऱ्या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत गुत्तेदाराच्या मार्फत सी सी रोडचे काम होत असल्यामुळे ते काम गुत्तेदार व सांबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने निकृष्ट दर्जेचे होत असल्याचा नागरिकानी आरोप करीत दिनांक २० जुलै २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय टाकळी बु समोर अमरण उपोषणास बसले असल्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यानी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणे आहे
" भारतीय लहुजी सेना उपोषणाचा तिसरा दिवस  "

उपोषण कर्ते - श्रीमती पार्वतीताई विठ्ठलराव रेड्डी शिवाजी विठ्ठलराव रेड्डी यांचे उपोषण विविध मागण्यासाठी टाकळी बु येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर करण्यात येत असून सदरच्या उपोषणाची दखल झोपेतील प्रशासन अध्याप तरी घेतले नसल्याचे उपोषण कर्त्यांचा सणसणीत आरोप करीत माय लेकराच उपोषण चालू आहे 

तालुक्यातील टाकळी बु येथील गावाच्या मध्ये भागातून सी सी रस्ता करण्यात येत असला तरी दलित वस्तीच्या बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व गुत्तेदार यांनी दोन ते तीन फूट रस्ता लोकांच्या मालकी हक्काचा रस्त्यासाठी जागा घेऊन सदरचा रस्ता करीत असून सदरचा रस्ता घेत असता दुसऱ्या बाजूने सामान रस्ता न घेता सीसी रस्ता करत असले तरी सदरच्या सीसी रस्त्याचे दर्जेदार करण्या ऐवजी निकृष्ट दर्जेचे काम गुत्तेदारासह सार्वजनिक बांधकाम करीत असल्याचा आरोप करीत उपोषणास बसले आहे

"उपोषणास बसलेल्या उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या "

सी सी रोडच्या दोनी बाजूने गटाराचे पाणी जाण्यासाठी नाली बांधकाम करून पाईप लाईन टाकावे, ग्रामपंचायत कार्यालयाचे मागील १५ वर्षाचे ऑडिट रिपीर्ट दिलेच पाहिजे, दलित मागासवर्गीयाच्या शेतात विहीर व बोअर मंजूर केलेली यादी द्यावी,दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत केलेल्या कामाचा आढावा मिळावा, प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्याचे नळ मिळालेच पाहिजे,समाज मंदिराच्या एकूण जागेचे क्षेत्रफळ मिळालेच पाहिजे दलित मागासवर्गीय समाजातील घरे व दुकाने यांची घरपट्टी मिळालीच पाहिजे,रोडचे काम करणाऱ्या गुत्तेदाराची चौकशी झाली पाहिजे अशा प्रमुख मागण्या उपोषण कर्त्यांच्या आहेत






Post a Comment

0 Comments