नांदेड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शासनाने तात्काळ शेतीच्या पिकाचे पंचनामे करावे असे ॲड शांतीताई काळे यांनी केली आहे
जिल्ह्यात सततच्या पावसाने सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अतिशय परिश्रम घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली आहे
या जिल्ह्यातील नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी प्रशासनाला ॲड शांती काळे यांनी विनंती आहे
कारण मी एक शेतकऱ्यांची मुलगी असल्यामुळे शेतकऱ्यांचे सुख आणि दुख जाणते त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेबांनी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करण्यासाठी आदेशित करावे अशी मी जिल्हाधिकारी राऊत यांच्या कडे मागणी करते आहे
शासनाने शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे करावे असे मागणी ॲड शांती काळे यांच्या वतीने करण्यात येत असून शेतकरी राजा त्यांच्या शेतातील पिके वाहून व नुकसान झाली असल्याने शेतकरी चिंतेत आहे
जिल्यातील सर्व तालुक्यातील मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने सदरच्या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट टाकून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी जिल्ह्यातील एकमेव महिला ॲड शांती काळे हीं करीत आहे
शेतकरी राजा अगोदरच कर्ज बाजारी होऊन त्यांच्यावर दुबार तिबार पेरणीचे संकट कोसळले असताना त्यातच नैसर्गिक आपत्तीने संकटात भर घातली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी यांच्या मार्फत करून शेतकऱ्याच्या बँक खात्यात येत्या पंधरा दिवसात अनुदान जमा करावे अशी मागणी ॲड काळे या महिलेने केली आहे

0 Comments