Header Ads Widget

मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निवगा रेल्वे गेट जवळ मृत अवस्थेत इसमाचे प्रेत सापडले ओळख पटली नसल्याने पटविण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सपरे यांच्यासह ए एस आय बालाजी गिते यांचे आवाहन

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या निवगा रेल्वे गेट जवळ एका पुरुषाच्या डोक्याला मार लागल्यामूळे मृत अवस्थेत दिनांक २५ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी प्रेत सापडले असल्याची पोलीसाना मिळताचे ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंतराव सपरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय बालाजी गिते यांच्या जमादार बलविरसिंग ठाकूर चंद्रशेखर मुंडे अविनाश पांचाळ यांनी सदरील घटनेचा पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले आहे

मुदखेड तालुक्यातील निवगा येथे म्हणजे पोलीस ठाण्याच्या अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर डोक्याला मार लागून मृत्यू पावलेल्या इसमाची ओळख पटली नसली त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंतराव सपरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याचे ए एस आय बालाजी गिते यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे

तालुक्यातील मुगट ते मुदखेड रेल्वे पटरी क्रमांक ३६८/ ५ जवळ डोक्याला गंभीर मार लागून मरण पावला असल्याची खबर धनराज चंदू बळवंते धंदा नौकरी रेल्वे स्टेशन मुदखेड यांनी सदरच्या मयताची माहिती दिली असून सदरच्या मयत इसमाची उंची ५ फूट, बांधा सडपातळ, अंगात पांढऱ्या रंगाचे धोतर अंगात कमिश काळ्या रंगाची पट्याची चड्डी असलेले अंडअरवेल अशा वर्णनाचा इसम मृत अवस्थेत मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे

ठाण्याच्या अंतर्गत सापडलेल्या प्रेतांचे शवविच्छेदन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस निरीक्षक वसंतराव सपरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या फौजदार शिंदे मॅडम यांनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदरच्या अनोळखी फिरतांची ओळख पटली नसल्यामुळे सपोनि शिंदे मॅडम ९०११६८९०२५ त्याच बरोबर मुदखेड पोलीस ठाण्याचे ए एस आय, बालाजीराव गीते यांनी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने केले आहे 




Post a Comment

0 Comments