माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या पत्नी सौभाग्यवती मांजरम जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य पुनमताई पवार यांच्यासह नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी बरबडा भागात दौरा केला आहे
बळेगाव अंतरगाव काहाळा या ठिकाणी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून व नुकसान झाले असल्यामुळे त्यांची पाहणी करण्यात आली आहेतालुक्यातील मांजरम जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सौ पूनमताई पवार यांच्यासह नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी दिनांक २९ जुलै २०२३ रोजी या विभागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे प्रशासना कडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सौ पूनमताई राजेश पवार यांनी प्रयत्न करणार आहेत
सध्याच्या परिस्थिती मध्ये गेल्या दिनांक २२ तारखे पासून तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे प्रशासन आपल्या बांधावर आले असल्याचे शेतकऱ्यातून बोलल्या जात असून यापूर्वी नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी नायगाव तालुक्याचा दौरा करून पूर परिस्थिती बरोबर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे

0 Comments