बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या डोळस विचारातून गेल्या सहा वर्षापासून ठाण्यात कार्यरत असलेल्या एका फौजदारासह दोन महिला पोलीस कर्मचारी तसेच सहा पोलीस अंमलदार अशा एकूण नऊ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याच्या नंतर ठाण्याच्या वतीने नऊ कर्मचाऱ्यांना कपडे रुपये आयर करून सन्मान करणारे नांदेड जिल्ह्यातील एकमेव पोलीस ठाणे रामतीर्थ असल्यामूळे सपोनि दिघे यांच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि संकेत दिघे यांनी बदली झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्यासह आठ कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता या निरोप समारंभाच्या कार्यक्रमा मध्ये आपल्या सर्व सहकार्याला मोठ्या सन्मानाने कपड्यांच्या स्वरूपात अय्यर घेऊन त्यांचा निरोप समारंभ मोठया थाटात केला आहे
पोलीस ठाण्यात काम करीत असताना पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची अत्यंत गरज असते आणि कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांची गरज असते असे एकमेकाचे नाते टिकवून ठेवण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या वतीने अभिनंदन हे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
रामतीर्थ पोलीस ठाण्यात गेल्या सहा वर्षा पासून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस कर्मचारी रघुनाथ राठोड रमेश राठोड प्रल्हाद आडे रस्सीदखान पठाण शेख मुख्तार क्षीरसागर बोडके मगर मनीषा वाघमारे यांची नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार बदली करण्यात आली असल्यामुळे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या वतीने नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला आहे
नांदेड जिल्ह्यातील अशा कर्मचाऱ्यांना कपडे रुपी भेट आहेर करून सन्मान करण्यात आला असल्यामूळे जिल्ह्यातील एकाच वेळी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांसह महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा कपडे करून सन्मान करणारे एकमेव रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे या पोलीस अधिकाऱ्याच्या अभिनंदनिय कार्याची बिलोली व नायगाव तालुक्यात चर्चा होताना ऐकावयांस मिळत आहे

0 Comments