महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडीला मोठा वेग आला असून आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी उलथा पालथ होत आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा.शिवराज पाटील होटाळकर हे आमचा नेता पावरफुल असल्याचे त्याच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे
राज्याच्या राजकारणात पक्ष बदलीचे अनेक प्रयोग चालू करण्यात आले असले तरी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी नायगाव विधानसभा मतदार संघाची व नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा.शिवराज पाटील होटाळकर यांना संधी मिळू शकते असे त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकत्रितपणे घेऊन चालण्याचे काम केवळ माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर करू शकतात असा ही सवाल त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे
सन २०२४ मध्ये येणाऱ्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत रणसंग्राम उठवण्यासाठी होटाळकर यांच्या कर्तृत्वाची गरज असल्यामुळे नक्कीच आमदारकीची संधी मिळू शकते असा सवालही कार्यकर्त्यांनी केला आहे

0 Comments