Header Ads Widget

हिमायतनगर पंचायत समितीचे विस्तार अधिकाऱ्याची थेट घेतली नायगाव फास्ट न्यूजने मुलाखत


हिमायतनगर : नागोराव शिंदे :-

हिमायतनगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी 
एस आर शिंदे विस्तार अधिकारी पंचायत पी.जे. टारपे विस्तार अधिकारी तालुक्यातील पळसपुर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आले असता नायगाव फास्ट न्यूजचे विशेष तालुका प्रतिनिधी यांनी थेट मुलाखत घेतली आहे
या मुलाखती मध्ये सध्याच्या परिस्थिती मध्ये सर्व दूर पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे व नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ते व्यवस्थित आहेत की नाही कुठे रस्ता तुटला का ? पुरामुळे काही अनुचित प्रकार घडला का ? ही सदर चौकशी करण्यासाठी व पाहणी करण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे
पळसपूर येथे घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी असे सांगितले की सदरच्या मुसळधार पावसामुळे कोणाच्या घराची पडझड झाली असेल कोणाचे नुकसान झाले असेल तर प्रशासनाला तात्काळ अहवाल पाठवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर मॅडम त्याच बरोबर कापसे मॅडम यांनी आदेशित केल्यामुळे प्रशासनाच्या वतीने गावागावात जाऊन पाहणी करत असल्याचे दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बळवंत यांनी कोणाच्या घरात पाणी शिरले असेल कुणाची जनावरे वाहून गेले असतील यांचा अहवाल पाठवण्याच्या संदर्भामध्ये तालुक्यातील पळसपुर येथे प्रशासकीय पाहणी करून शासनाला अहवाल पाठवण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावाला भेट दिली असल्याचे हिमायतनगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी सांगितले आहे 



Post a Comment

0 Comments