Header Ads Widget

मांजरम ग्रामपंचायत कार्यालयाच्या गावचे भूमिपुत्र तथा मंडळधिकारी कळकेकर यांनाा सेवा निवृत्तीचा तर तलाठी शहाणे यांची बदली झाल्यामूळे निरोप !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मांजरम येथील रहिवासी असलेले व गावचे भूमिपुत्र दत्तात्रेय कळकेकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून नायगाव तहसील प्रशासनात उत्कृष्टपणे कामगिरी केली असल्यामूळे त्यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम दिनांक १३ जुलै २०२३ रोजी गावचे तलाठी शहाणे यांची बदली झाली असल्यामुळे मांजरम ग्रामपंचायत कार्यालयांच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी तर बदलीवर गेलेल्या तलाठ्याना निरोप देण्यात आला आहे 

तालुक्यातील मांजरम पंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच सौ शोभाताई निळकंठराव पाटील मांजरमकर यांचे प्रतिनिधी निळकंठराव माली पाटील मांजरमकर यांच्या विशेष उपस्थिती मध्ये निरोप समारंभात सत्कार करण्यात आला आहे

या सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय मांजरम येथील उपसरपंच प्रतिनिधी हणमंतराव पाटील शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तथा ग्रामपंचायतचे सदस्य व पत्रकार बालाजीराव माली पाटील शिवाजीराव पाटील शिंदे सर्कल प्रमुख यांच्या हस्ते तलाठी शहाणे यांचा सत्कार करण्यात आला आहे

मांजरम येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे विद्यमान अध्यक्ष शिवराज पाटील शिंदे मांजरमकर सामाजिक कार्यकर्ते आनंदराव कांबळे गावचे पोलीस पाटील जयराज पाटील मांजरमकर व सर्व ग्रामपंचायत सरपंच व सन्माननीय सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

गावचे भूमिपुत्र तथा नायगाव प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरी बजावून सेवानिवृत्त झालेले दत्तात्रय कळकेकर व तलाठी शहाणे यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला आहे 


Post a Comment

0 Comments