Header Ads Widget

बिलोली तालुक्याच्या गंजगाव येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांना बाहेर काढले तर मुखेड तालुक्यातील पाळा होनवडज कोळनुर येथे पुराचे पाणी शिरले आणि देगलूर तालुक्यात मन्याड नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला असेच धर्माबाद परिसरात ही घरात पूर गेला

            माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या गंजगाव येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांना बाहेर काढले तर मुखेड तालुक्यातील पाळा होनवडज कोळनुर येथे पुराचे पाणी शिरले आणि देगलूर तालुक्यात मन्याड नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे

धर्माबाद परिसरात ही घरात पूर गेला असल्याचे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन व्रत प्रकाशित करण्यात येत आहे 

बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील पुरात करण ऋषी, विशाल ऋषी व अर्जुन जाधव यांनी पुराच्या पाण्यात आडकले होते त्यांना लक्ष्मण पोशट्टी वनरवाड ,माधव सयाजी वननरवाड बसवराज पाटील, संभाजी तोटलवार, साहेबराव घाटे व शेख अनवर यांनी सुखरूप बाहेर काढण्यात आले

अशा बहादूर व्यक्तीना म्हणजे पुरातून बाहेर काढणाऱ्याना लोकांना शासना कडून शाबासकी देण्या ऐवजी त्यांना पुरस्कार जाहिर करावा अशी मागणी  होत आहे

मुखेड तालुक्यातील पाळा  व कोळनुर होनवडज या  गावातील काही घरात पाणी शिरले असल्याची माहिती आहे येथील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात येते जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य यशस्वी तहसीलदार प्रत्यक्ष मदत कार्यात असल्याचे काही लोकांचे म्हणे आहे

बिलोली तालुक्याच्या गंजगाव येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांना बाहेर काढले तर मुखेड तालुक्यातील पाळा होनवडज कोळनुर येथे पुराचे पाणी शिरले आणि देगलूर तालुक्यात मन्याड नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे 

देगलूर ते नांदेड रस्त्या वरील खानापूर लगत असलेल्या वन्नाळी वझरगा ते अटकळी या तिन्ही गावाच्या रस्त्या वरून पाणी वाहत असल्याने या भागात ढगफुटी होऊन नद्या मन्याड नदीला पूर आल्याचे सांगितले जात आहे

अनेक गावांतील घरात पाणी शिरून अनेक गावचा संपर्क तुटला त्याच बरोबर वन्नाळी , वझरगा व अटकळी मन्याड नदी लगत असल्याने रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे नांदेड ते देगलूर वाहतूक बंद झाली असल्याचे रात्री सांगण्यात आले आहे


Post a Comment

0 Comments