Header Ads Widget

भाजपात कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बरबड्याचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी स्विकारले - भाजपाला खिंडार !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील दिलीप धर्माधिकारी यांनी गेल्या काही वर्षाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजप पक्षात प्रवेश केलेले व दिनांक २७ जुलै २०२३ रोजी मुबंई येथे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन घड्याळ स्विकारणारे धर्माधिकारी यांनी भाजपाला जय महाराष्ट्र केल्यामूळे ग्रामीण भाजपाला मोठी खिंडार पडली आहेराष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पक्षात बरबड्याचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी भाजपाचे कमळ कोमेजून राष्ट्रवादीचे घड्याळ स्विकारल्यमूळे भाजपाला चांगलीच गळती लागली भाजपा पक्षात कार्यकर्त्याची गर्दी होत असल्यामुळे मी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षात प्रवेश केले असल्याचे बरबड्याचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी प्रवेश केल्याचे सांगितले आहेभाजपा पक्षात प्रवेश घेण्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी काम केले नंतर काही तरी तांत्रिक अडचणीमूळे भाजपाचे कमळ स्वीकारले होते परंतु भाजपा पक्षात कार्यकर्त्याची गर्दी  होत असल्यामुळे मी माझ्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला सदरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी सांगितले आहे 

नायगाव तालुक्यात भाजपाचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामूळे भाजपाचे कमळ कोमेजले आणि व सदरच्या पक्षाला चांगलीच खिंडार पडली असून सदरचा प्रवेश हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीपरावाच्या हाताला घड्याळ बांधले असल्यामुळे भाजपाला खिंडार पडली आहे 


Post a Comment

0 Comments