Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा निवड मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतून सहाय्यक विक्रीकर पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यामूळे गावकऱ्याच्या वतीने सत्कार !!

               माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे अंचोली सारख्या छोट्याशा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोली येथे  पहिली ते सहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाला व पुढील शिक्षण उच्च पदावर पोहोचलेल्या शिवराज मोरे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोलीच्या व गावकऱ्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आहेतालुक्यातील अंचोली येथील रहिवासी असलेले त्यांचे वडील संतुकराव पाटील मोरे यांनी अतिशय परिश्रने आपला मुलगा शिवराज यांना शिक्षण शिकविले व मुलाची शिक्षणाची जिद्द असलेला मोरे हा इयत्ता दहावीत दोन वेळा अनुउत्तीर्ण होऊन सुद्धा शिवराज मोरे यानी प्रशासकीय सेवेत यशस्वी पदार्पण केले आहेसर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आई-वडिलांचे व गावकऱ्यांचे स्वप्न साकार करणारा शिवराज हा यशाचे शिखर गाठले त्याचे आई- वडील गुरुजन, मोठा भाऊ माधव संतुकराव पाटील मोरे यांचा यांच्या शिक्षणात सिंहाचा वाटा आहे यावेळी शाळेत शिवराजने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कठीण परिस्थितीवर मात करीत अभ्यास करावा आणि उच्च पदावर जाण्यासाठी परिश्रम घेऊन विध्यार्थानी परिश्रम घ्यावे असा महत्त्वाचा संदेश दिला आहे
यापुढे आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न ठेवून प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रयत्न करावा असा ही शिवराज मोरे त्यांनी संदेश दिला आहे 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख आर.‌ एन चिखलवाड सरपंच प्रतिनिधी अशोक पाटील मोरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गायकवाड, नरंगल शाळेचे मुख्याध्यापक एम टी मोरे, सहशिक्षक भारत घोरपडे, स्वाती अडबलवार मॅडम, यांच्यासह गोविंदराव पाटील मोरे गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवराज संतूकराव मोरे यांचे अभिनंदन करीत त्यांचा विशेष सत्कार केला त्याच बरोबर युवा मित्र  मंडळ यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments