महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे शेतकऱ्याच्या खरीप पिकाचा विमा एका रुपयात भरला जात असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांचे सर्वत्र लक्ष असल्यामुळे सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर व अन्य सेंटर येथे पीक विमा एका रुपयात भरला जात आहे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा पिक विमा सदरच्या सेंटर धारका कडून एका रुपयात भरला जात असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पीक विमा भरत असून आधीकच्या शेतकऱ्यांनी सुद्धा विमा भरण्यासाठी घुंगराळा येथील सेंटरवर विमा भरण्यासाठी यावेत असे सेंटर धारका कडून आवाहन करण्यात येत आहे
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे दिनांक १ जुलै २०२३ पासून शेतकरी राजांना शासनाने एका रुपयात विमा भरून घेण्यासाठी आवाहन केले होते त्यानुसार शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पीक विमा भरून घेत असल्यामुळे शासनाच्या आदेशाचा लाभ शेतकरी वर्ग घेताना दिसून येत आहे
सदरचा पिक विमा एका रुपयात भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ असल्याचे सांगण्यात येते परंतु सध्याच्या परिस्थिती मध्ये शेतकरी वर्ग पाऊस पडला नसल्यामुळे व पेरणी लांबली असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी शासनाने तारीख वाढवून देण्याची गरज भासत आहे

0 Comments