Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करावे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या नेतृत्तवाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्याक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या वतीने तहसीलदाराला निवेदन

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील सततच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या वतीने  दिनांक २८ जुलै २०२३ रोजी देण्यात आले आहे

तालुक्यातील सर्व भागांमध्ये मुसळधार पावसाने अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली व सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी सदरच्या जमिनीकडे व पिकाकडे पाहून डोक्याला हात लावले असल्यामुळे शेतकरी राजा हैराण दिसत आहे

प्रशासनाच्या मार्फत तात्काळ पंचनामे सरसकट करून शेतकऱ्याना पन्नास हजार रुपये हेक्टरी अशा पद्धतीची मदत शासनाने करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी नायगावच्या तहसीलदारांना निवेदन देऊन कळविले आहे

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्यासह अंकुश पाटील संतोष ढगे  केरबा रावते विलास ढगे हणमंत धुमाळे  आनंदा सूर्यतळ  त्रिबक मदेवाड बळवंत मोरे दिलीप ढगे राजू पा ढगे योगेश ढगे महाजन धुमाळे बालाजी तोडे बालाजी मोरे आदी वेळी उपस्थित होते 

बरबडा जिल्हा परिषद गटासह अन्य भागामध्ये गोरगरिबाच्या घरात पुराचे पाणी जाऊन अनेकांच्या घराची पडझड झाली असल्यामुळे या गंभीर बाबीकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी दिरंगाई करू नये अशा पद्धतीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनावर निवेदन कर्त्यांच्या सह्या आहेत 

Post a Comment

0 Comments