Header Ads Widget

राजकीय वर्तुळात असो की ग्रामीण भागात असो सत्ता मात्र आपल्याच घरात असली पाहिजे - परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील यांच्या प्रयत्नातुन व्होईस चेअरमन चंद्रप्रकाश पाटील ढगे झाले :-:

        माधव पवार
राज्याच्या राजकारणात आणि ग्रामीण भागात राजकारणाचा मोठा फरक असतो राजकारण हे राजाच्या हितासाठी असतो तर ग्रामीण भागातील राजकारण आपल्या गावापूर्ते असतो तशाच पद्धतीने नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये मागील सहा वर्षे माजी चेअरमन नारायण पाटील ढगे यांनी सत्ता भोगली आहे

नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या माध्यमातून घुंगराळा सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रप्रकाश पाटील हे सध्या कार्यन्वीत आहेत परंतु सत्ता मात्र घरात असली पाहिजे हा अनेक हट्ट असतोच असे वास्तु चित्र घुंगराळा येथे पाहवयास मिळत आहे 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात असलेले राजकारण हे कोणत्या ही एका पक्षाचे नसतो काँग्रेस पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा शिवसेना पक्ष असो की भाजपा पक्ष असो गावांतर्गत होत असलेल्या राजकारणा वरून सदरचे राजकारण ठरते सर्व पक्षाची मंडळी गाव लेव्हल काम केल्या जाते  म्हणून सत्ता कोणत्या ही मार्गाने आपल्याच घरात राहिली पाहिजे असा अनेकाचा मूळ हेतू असतो

नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाची सत्ता सुद्धा कोणत्याही एका पक्षाची नाही संपूर्ण गावांतर्गतचे गट कुणी भाजपा सोबत युती केली तर कोणी काँग्रेस सोबत युती केली तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ग्रामपंचायतची सत्ता प्रस्थापित केली परंतु घुंगराळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्या विशेष प्रयत्नातून  सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून चंद्र प्रकाश पाटलांची नेमणूक करण्यात आली आहे 


Post a Comment

0 Comments