नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा काढण्यासाठी गावांतच यंत्रणा राबणार असल्याचे सांगितले आहे
परंतु ग्रामीण भागात असलेल्या रुई बु येथे शेतकऱ्यानी एका रुपयात विमा काढण्यासाठी तयार असताना सुद्धा गावात कोणतीच यंत्रणा विमा काढण्यासाठी आली नसल्यामुळे केवळ बोलाचाच भात बोलाची कडी म्हण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे
तालुक्यातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यानी नायगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी एका रुपयात पीक विमा भरीत असताना नायगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांनी ज्यादा पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागत असल्याचे काही जागी लक्षात आहे
आता गावात शेतकऱ्यांना मोफत पीक विमा भरण्यासाठी सूचना केल्या आहेत परंतु अध्याप त्यांची यंत्रणा रुई बु येथे आलेली नसल्यामुळे कमालीचे आश्यर्य व्यक्त करण्यात येत आहे
आमदार राजेश पवार सूचना करतात परंतु त्यांची अमलबजावणी नीट केली जातं नाही दिनांक १ जुलै २०२३ पासून सरकारने शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा भरण्यासाठी आदेश दिल्या नुसार पीक विमा भरत आहेत
परंतु आमदार राजेश पवार यांनी शेतकऱ्यांना गावातच पीक विमा भरून घ्यावे अशी सूचना केली परंतु अद्याप गावात पीक विमा भरून घेण्यासाठी आमदाराची यंत्रणा गावात आली नसल्यामुळे पीक विम्या पासून वंचित राहणार की काय ? असा प्रश्न भेडसावत आहे

0 Comments