नायगाव मतदार संघाची मतदानाची टक्केवारी चांगली असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ही टक्केवारी कायम ठेवण्याचे आवाहन स्वीकारून सदर टक्केवारी अधिक अधिकची कशी वाढवता येईल याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत असे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आवाहन केले आहे
याबाबत तसेच टक्केवारी वाढीसाठी अभिनव पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिनांक १९ जुलै रोजी नायगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले आहे
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत यांनी बुधवारी १९ जुलै २०२३ रोजी नायगाव मतदार संघातील सर्व तहसीलदाराना सूचित केले आहे
नायगाव येथील जयराज पॅलेस मंगल कार्यालय येथे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दिनांक १ जानेवारी २०२४ च्या आर्हारता आधारित मतदान यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण शुद्धीकरण व मतदान केंद्र सूत्रीकरण कार्यक्रमांतर्गत नायगाव मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सुपरवायझर यांच्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत मार्गदर्शन करताना ते बोलत होते
यावेळी ८९ नायगाव विधानसभा मतदारसंघाचे सहा.मतदान नोंदणी अधिकारी तथा नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत उमरीचे तहसीलदार हरीष गाडे नाईप तहसीलदार संजय देवराय काशिनाथ देशेटवाड संजय सोलनकर गिरीष सर्कलवाड बी आर गावंडे हे उपस्थित होते
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की मतदान यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आगामी टप्प्यात दिनांक २१जुलै जुलै ते २१ ऑगस्ट २०२३च्या कालावधीत केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांनी मतदाराचे एच २ एच सर्वे घरोघरी भेटी देऊन मतदाराची पडताळणी करणे बाबत तसेच मतदार संघाच्या मतदान टक्केवारीत आणखी वाढ करणे बाबत अधिक प्रयत्न करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यानी सूचना दिला आहे
जन जागृतीने करणे बाबत मतदार याद्या अद्यावत करणे व त्यासाठी नव मतदाराची ऑनलाईन यादी करण्यास तो विविध महाविद्यालयात शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी म्हणाले आहे
यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले बी एल ओ या वापराच्या अनुषंगाने पावर पॉइंट प्रेझेटेशन द्वारे सविस्तर माहिती साईनाथ भंडारे यांनी दिली पी एल ओ सुपरवायझर उद्धवराव ढगे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले आहे
सदरील कार्यशाळेसाठी नायगाव मतदार संघातील उमरी धर्माबाद तालुक्यातील सर्व ३४५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ३५ सुपरवायझर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आ. का रोशन सिंगग्रंथी मेटकर मह. सहा लक्ष्मण अनमवाड दिलीप भुरे शेख युनूस तलाठी हेमंत यसनकर शिपाई बालाजी इबितवार गजानन शिरटकर साहेबराव गायकवाड दिगंबर गिरी ज्ञानेश्वर कोटकर व सुधाकर डोईवर साईनाथ भंडारवाड साहेबराव यांनी प्रयत्न केले आहे

0 Comments