नायगाव तालुक्यातील गडगा येथील रामदास भाकरे यांनी सिंचन विहीरी गडगा ग्रा.पं.ने अधिग्रहण केली होते मात्र १५ महिन्या पासून तालुक्यातील एका ही लाभार्थ्यांना अद्याप ही अधिग्रहण केलेल्या विहिरीचे बिले देण्यात आले नसल्यामुळे ते तात्काळ देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे
जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिनांक २६ जुलै २०२३ रोजी उपोषणास बसणार असल्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई पाणीपुरवठा मंत्री मुंबई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
तालुक्यातील ८९ गावे आहेत या गावाचा कारभार तत्काकालीन तहसिलदार गजानन शिंदे यांनी सांभाळला असला तरी तालुक्यातील एकूण ५४ लाभार्थाच्या सिंचन विहिरीच्या अधिग्रहनाचे एकूण ३० लाख २८ हाजर ४०० रुपये रखडले असल्यामुळे लवकरात लवकर शासने द्यावे अशी मागणी रामदास भाकरे यांनी केली आहे
सदरच्या तक्रार कर्त्यांनी अनेक वेळा अधिकाऱ्याना भेटून सुद्धा अध्याप अधिग्रहण केलेले पैसे मिळाले नसल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून दिनांक २६ जुलै २०२३ नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचा रामदास भाकरे यांनी इशारा दिला आहे
तत्कालीन तहसिलदार गजानन शिंदे यांच्या कार्यकाळातील ५४ अधिग्रहण लाभार्थ्यांना रक्कम मिळाली नसल्यामुळे शासनाने तात्काळ द्यावेत असा अल्टीमेटम देण्यात आला आहे
'

0 Comments