Header Ads Widget

पळसपुरच्या ग्रामसेवकाने भर पावसात स्वच्छता अभियान चालू !!

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

तालुक्यातील मोजे पळसपुर ग्रामपंचायत अंतर्गत गावातील स्वच्छता अबाधित राखण्यासाठी पळसपुर ग्रामपंचायतीने ठोस पाऊल उचलून नाली सफाईचे काम चालू केले असल्यामुळे नागरिकाच्या आरोग्याला होणारा धोका टळला असल्याने नागरिकातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे

रस्त्यावर येणारे घाण पाणी त्याची विल्हेवाट लावण्याचे काम भर पावसामध्ये ग्रामसेवकाने उभे राहून स्वच्छता अभियान राबविल्याने ग्रामसेवक एस व्ही शिरार पल्लू यांनी आपल्या ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पळसपुर येथे रस्त्यावर जागोजागी साचलेल्या पाण्याची आणि नाल्या उपसण्याचे काम प्रगतीपथावर चालू करण्यात आले आहे 

ग्रामस्थांना एक दिलासा दिल्याचे काम केल्याने त्यांचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य गंगाबाई मांजरे संजय वानखेडे वनमाला वानखेडे यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत ची शिपाई आबाराव पवार राजू चांदणकर संजय वाडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments