Header Ads Widget

माळाकोळी पोलीस ठाण्याच्या जबाबदार पोलिस अधिकाऱ्याची बडिया कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या हस्ते भीम जयंती मंडळाचा गौरव

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या माळाकोळी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्षेत्रातील भीम जयंती मंडळाने अतिशय शांत व वेळेत जयंती सोहळा पार पाडला आहे

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांच्या हस्ते जयंती मंडळास गौरविण्यात आलेले आहे

जिल्ह्याच्या माळाकोळी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक अबिनेश कुमार उपविभागीय पोलिस अधिकारी मारोतराव थोरात कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीच्या बैठका आयोजित केल्या होत्या

अशी माहिती सपोनि संजय निलपत्रेवार यांनी नायगाव फास्ट न्यूजचे पत्रकार माधव पवार यांना दिली आहे

कंधार तालुक्यातील माळाकोळी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सन २०२३ रोजी भारतीय राज्य घटना कारांची जयंती मोठया उत्साहात साजऱ्या करण्यात आल्या आहेत

सदरील भीम जयंती मंडळाने बक्षीस वितरण समितीने ठरवून दिलेल्या नियमानुसार व त्यांचे पालन करून स्वतःचे स्वयंसेवक तयार करून भीम जयंती सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी अतिशय प्रयत्न केले होते जयंती सोहळ्यात वाजणारे वादे यांचा सुद्धा आवाज व्यवस्थित ठेवून मिरवणुका काढण्यात आल्या होत्या

अशा प्रकारे शांततेत मिरवणुका पार पाडणाऱ्या जयंती मंडळ बक्षीसास पात्र झाल्यामूळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये जयंती मंडळास स्मृतिचिन्ह देऊन जयंती मंडळाचा विशेष गौरव करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments