माधव पवार
नांदेड जिल्हा परिषदेच्या नूतन महिला मुखकार्यकारी अधिकारी यांच्या कडून जिल्ह्यातील सर्व शिक्षकाना असे आवाहन करण्यात येते शिक्षकानी प्रेरणा परीक्षेला बसावे मी प्रथमच कार्यालयात आलो असल्यामूळे सर्व शिक्षकाला भेटणे शक्य नसल्यामुळे सदरच्या व्हिडीओच्या माध्यमातून असे आवाहन करण्यात येत आहे
जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रेरणा परीक्षेत शिक्षकानी सहभाग घ्यावेत असे जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल यांनी केले आहे जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा असा उद्देश असून शिक्षकाना विषय ज्ञान वृद्धिंगत व्हावे त्यांना स्वयं अध्ययनाची गोडी लागावी विषय ज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी यासाठी प्रेरणा परीक्षा शिक्षकाना द्यावी लागणार आहे
शिक्षक प्रेरणा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी या उद्देशाने विभागीय आयुक्त यांनी मराठवाड्यातील पहिली ते दहावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे.

0 Comments