Header Ads Widget

भाजपा पक्षात उत्कृष्ट पणे काम करणाऱ्या निष्ठावंत पुढाऱ्यासह कार्यकर्त्याच्या मी पाठीशी -

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सोबत छाया चित्रात दिसत असलेले नायगाव विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत पुढारी व भाजपाचे कार्यकर्ते एकत्रित पणे काम करत असल्याचे सदरचे बोलके चित्र सांगून जात आहे

येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणूक त्याच बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत

याच चित्रावरून राजकीय निष्कर्ष काढला तर नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत या चित्रावरून दिसून येत असून त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत पुढाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी सुद्धा उभा असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे 

जिल्ह्यातील नायागांव विधानसभा मतदार संघ हा राजकीय दृष्टीकोनातून वेगळा असल्यामुळे या मतदार संघावर अनेक पक्षाच्या नेते मंडळीचा डोळा असल्यामुळे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली काम करणारे निष्ठावंत राजकीय पुढारी व कार्यकर्ते एक दिलाने पक्षात काम करीत असल्याचे चित्र सदरच्या छाया चित्रात दिसून येत आहे

नायागांव विधानसभा मतदार संघाचे विधान परिषदेवर गेलेले आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती व नायगाव कृषी उत्पन्न बाजार  कमिटीचे उपसभापती शिवराज पाटील होटाळकर राजेश देशमुख कुंटूरकर श्रावण पाटील भिलंवडे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार माजी जिल्हा परिषदचे सदस्य माणिकराव लोहगावे यांना खासदार प्रताप चिखलीकर कामाला लागा असा संदेश दिला की काय ? असा प्रश्न पडतो आहे 


Post a Comment

0 Comments