या पृथ्वीतलावर मानव धर्मातील माणसातील देव मानले जाणारे व रुग्णाच्या सेवेसाठी २४ तास कामगिरी बजावणाऱ्या माणसातील परमेश्वरांचा दिनांक १ जुलै २०२३ रोजी डॉक्टर दिन म्हणून उत्साहात साजरा झाला आहे
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील अतिशय जवळचे नाते असल्यामुळे डॉक्टर पेशारुपी माणसातील देव म्हणजे डॉक्टर यांच्या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहे
कोरोना महामारीच्या काळात माणसातील देव म्हणजे डॉक्टर यांच्यावर जनतेचा मोठ्या प्रमाणात विश्वास असल्यामुळे आज घडीला डॉक्टर शिवाय पर्याय नाही अशा उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या व कामगिरी करणाऱ्या सर्व डॉक्टर वर्गातील व वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा अनेक क्षेत्रातून देण्यात आल्या आहेत
त्यांच्या आयुष्यातील व त्यांच्या हातून रुग्णाची सेवा चांगल्या प्रकारे घडावी म्हणून डॉक्टर दिनाच्या निमित्ताने भरगच्च शुभेच्छा देण्यात येत आहे
""" राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा इतिहासिक उत्सव """
डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये डॉक्टर दिन साजरा करण्याच्या संदर्भातील निर्णय घेतला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती
या देशाच्या प्रगतीमध्ये डॉक्टरांच्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो म्हणून अशा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर अनिस शेख, डॉ गुलाबराव वडजे, डॉ विश्वासराव चव्हाण, डॉ शिवाजीराव कागडे, डॉ आय एच खान यांना शुभेच्छा देणे अतिशय आवश्यक आहे
देशातील डॉक्टराच्या अमूल्य योगदानाची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो जगातील विविध देशांकडून डॉक्टरांचा दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो परंतु भारतातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त भारतात दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जात आहे

0 Comments