Header Ads Widget

मा.चिखलीकरानी ग्रामीण भागातील चिखल रस्त्याची पाहणी करून निधी उपलब्ध करून द्यावा जनतेची मागणी

       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघात कोठ्यावतीचा निधी आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून आला असला तरी पावसाळ्यापूर्वी कोणत्याच गावचा रस्ता खणखणीत झाला नसल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चिखल रस्त्याची पाहणी करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जन सामान्य माणसातुन केल्या जात आहे

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून आणलेला कोठ्यावधी रुपयाचा निधी कुठे रेंगाळला यांची चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित करतील का ? असा सवाल ही जनतेतून केला जात आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी गेल्या एक ते दोन महिन्या खाली ८९ विधानसभा मतदार संघात रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले परंतु सदरचे काम अद्याप चालू नसल्याचे दिसून येत असल्यामुळे चिखलमय रस्ते झाले आहेत 

ग्रामीण भागात कोट्यावधी रुपयांचा निधी येऊन सुद्धा रस्ते मार्गी लागलेले दिसून येत नाहीत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक रस्ते चिखलमय झाले असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चिखल रस्त्याची पाहणी करून सदरचा रस्ता करण्यासाठी अधिकाऱ्याची कान उघडी करतील का ? असा सवाल ही जनतेने केला आहे 





Post a Comment

0 Comments